
Mahatma Phule Agricultural University : नगर : महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात, घाट उतार आणि आदिवासी दुर्गम भागात घेतले जाणारे नाचणीचे पीक (Ragi crop) आता राहुरी सारख्या बागाईत पट्ट्यात घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) पुढाकारातून नाचणी या पिकाचा राहुरी तालुक्यात प्रथमच अंतर्भाव करण्यात आला आहे. हे पीक उन्हाळी आणि खरीप हंगामात घेता येते. चांगले उत्पादन देणारे हे पीक कापूस आणि कांद्याला (cotton and onion) पर्याय ठरू शकते.
नक्की वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ जून रोजी पूर्व परीक्षा

शिवार फेरी व नाचणी पीक प्रात्यक्षिके आयोजित
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेती बचाव अभियानांतर्गत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी भरडधान्यांचे उत्पादन आणि काढणीनंतरची मूल्य साखळी या प्रकल्पांतर्गत शिवार फेरी व नाचणी पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात उन्हाळ्यात घेतलेल्या प्रात्यक्षिकात नाचणी पिकाचे18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. कपाशी आणि कांद्याला या भागात हे पीक पर्यायी पीक होऊ शकते. हे पीक पौष्टिक तृणधान्यांमध्ये येत असल्याने आपल्या आरोग्यास हितकारक आहे. नाचणी हे पीक चांगले उत्पादन, उत्पन्न देणारे आणि आरोग्यवर्धक असल्याने शेतकर्यांनी याकडे वळावे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुधाकर बोराळे म्हणाले की (Mahatma Phule Agricultural University)
यावेळी सुधाकर बोराळे मार्गदर्शन करताना म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नाचणी पीक येणार्या काळात वरदान ठरणार आहे. शेतकर्यांनी पारंपारिक पिके सोडून आता पीक विविधीकरण संकल्पनेकडे जाणे गरजेचे आहे. जगाला लागणारे 60 टक्के पौष्टिक तृणधान्य आपण निर्यात करतो. नागलीच्या मूल्यवर्धनासाठी पी.एम.एफ.इ. योजनेअंतर्गत विविध सवलती उपलब्ध आहेत. परदेशात विषमुक्त अन्नासाठी जास्त भर दिला जातो. आपल्याला विषमुक्त अन्नासाठी पौष्टिक तृण धान्याकडे वळणे गरजेचे आहे असल्याचे म्हणाले.
सुनील दौंड यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन
यावेळी संतुलित खत वापर व्यवस्थापन या विषयावर डॉ. भीमराव कांबळे, नाचणीचे आहारातील महत्त्व या विषयावर डॉ. सुरेश दोडके, नाचणीची लागवड पद्धत या विषयावर डॉ. योगेश बन, खरीप हंगामासाठी बियाणे या विषयावर सुनील दौंड यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अन्वेषक डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती देऊन त्याची उद्दिष्टे सांगितली. या कार्यक्रमादरम्यान आरडगाव येथील भास्कर पंडित, कुणाल पवार, जालिंदर काळे आणि श्सुनील मोरे यांनी नाचणी पीक लागवडीबद्दल आपले अनुभव सांगितले.
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर व्यवस्थापन अभियान 2026 या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी जालिंदर काळे यांच्या शेतावरील नागली पिकाच्या प्रक्षेत्राला मान्यवरांनी व शेतकर्यांनी भेट दिली. प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सुनील अडांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. योगेश बन यांनी आभार मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रा. अन्सारखान आत्तार, रवींद्र मस्के, आरडगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग यांनी प्रयत्न केले.


