Political : विरोधात उरले फक्त एक खासदार दोन आमदार, अहिल्यानगर जिल्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला

Political : विरोधात उरले फक्त एक खासदार दोन आमदार, अहिल्यानगर जिल्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला

0
Political : विरोधात उरले फक्त एक खासदार दोन आमदार, अहिल्यानगर जिल्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला
Political : विरोधात उरले फक्त एक खासदार दोन आमदार, अहिल्यानगर जिल्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला

Political : नगर : एकेकाळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) प्राबल्य असलेला अहिल्यानगर जिल्हा आता राजकीय दृष्ट्या भगवा झाला. शिवसेनेतील (Shiv Sena) ताज्या फुटीनंतर जिल्ह्यात आता फक्त एक खासदार आणि दोन आमदार विरोधात राहिले आहेत. अलीकडेच जिल्ह्याला विधिमंडळात कधी नव्हे एवढे प्रतिनिधीत्व मिळाले. त्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी राज्यातील आणि केंद्रातील सत्तेच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्याने विकासात घौडदौड करावी, अशी अपेक्षा लोकांमधून व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : ठाकरेंशी पुन्हा गद्दारी! भाऊसाहेब वाकचौरे शिंदेंच्या तंबूत दाखल होणार…?

विरोधीपक्षात नीलेश लंके हेच राहिले

शिवसेनेने राबविलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ या राजकीय मोहिमेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे सहा खासदार बाहेर पडले, त्यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता विरोधीपक्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नीलेश लंके हेच राहिले आहेत. अर्थात मूळचे शिवसैनिक असलेले लंके यांच्यासंबंधी विविध चर्चा पूर्वीपासूनच आहेत. तर आमदारांपैकी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी) आणि श्रीरामूपरचे आमदार हेमंत ओगले (काँग्रेस) हे दोघेच विरोधी पक्षातील उरले आहेत. त्यातही एक दक्षिणेत आणि एक उत्तरेत असा जणू समतोल साधला गेला आहे. विधान परिषदेचे नव्याने निवडून आलेले आमदारही सत्ताधारी बाजूचे आहेत. आमदार सत्यजित तांबे अपक्ष असले तरी त्यांना निवडून येण्यासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी मदत झाल्याने ते सत्ताधारी बाजूला झुकलेले मानले जातात. उरलेले आमदार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीतील आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भाजपमध्ये बाहेरचे मोठे नेते आणि त्यांची मुलेही पक्षात (Political)

काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि कारखानदारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपने नियोजनबद्ध काम करून मोठ्या नेत्यांना किंवा त्यांच्या मुलांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. हे सुरू असताना जुने निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते दुखावले गेले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून त्यांची कधी समजूत काढून तर कधी दुर्लक्ष करीत पक्षाची गरज म्हणून हे करीत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपमध्ये बाहेरचे मोठे नेते आणि त्यांची मुलेही पक्षात आली. जिल्ह्याचे राजकीय दृष्टया भगवेकरण करण्याची ही प्रक्रिया भाजपने हाती घेतली होती. त्याला आता बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. अर्थात यात मूळ भाजपचे किती जण आहेत, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.