DC : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : डॉ. पंकज आशिया

0
DC : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : डॉ. पंकज आशिया
DC : लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : डॉ. पंकज आशिया

DC : नगर : जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात वाढ झाली असली तरी ते अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे ८०० पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असलेल्या ४४ गावांतील प्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या सहभागातून ११ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवून मुलींच्या जन्माविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते.

हेही वाचा : अडवणूक थांबवा,अन्यथा ‘या’ तारखेला पुन्हा आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

यांची उपस्थिती 

यावेळी पीसीपीएनडीटी राज्य पर्यवेक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुधा कांकरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी शिवशंकर वलांडे, ॲड. सारिका सुराशे तसेच अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, पारनेर, पाथर्डी, राहुरी, शेवगाव, अकोले, जामखेड, कर्जत आणि कोपरगाव तालुक्यांतील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

नक्की पहा : मोहरमच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

आशिया म्हणाले… (DC) 

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तरात सकारात्मक बदल दिसून येईल, त्या गावांचा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात येईल.