
नगर : मराठा समाजासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील मे महिन्यात भरउन्हात आमरण उपोषण (Indefinite hunger strike) सुरू केले. त्यानंतर सरकारने तातडीने काही मागण्या पूर्ण केल्या. पण हा आनंद काही क्षणांचा ठरला. शासन निर्णय होऊनही अधिकारी अडथळे आणत असल्याने मनोज जरांगे पाटील संतापले. आज अंतरवाली सराटीतून त्यांनी सरकारला पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा (Hunger strike again) दिला.
नक्की वाचा : कोपरगावात विनापरवाना कापूस बियाणे रॅकेट उद्ध्वस्त; पाच जणांवर गुन्हा दाखल
‘अधिकारीच निर्णयाची अंमलबजावणी होऊ देत नाहीत’ (Manoj Jarange Patil)
सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती जाहीर केल्या. त्याचा जीआरही काढला. पण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अधिकारी हेच अंमलबजावणीत अडथळा आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. कुणबी दाखले मिळवण्यासाठी आजही कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तहसलीदार व इतर अधिकारी अडवणूक करतात. मराठा आणि कुणबी मंत्रालयाची मागणी केली. तर दोन ओबीसी मंत्र्यांचा त्यासाठी किती विरोध सुरू आहे, असा संताप जरांगेंनी व्यक्त केला. मराठा समाजावर ही मंडळी का जळत आहे? मराठ्यांना अधिकार नाहीत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यात थरार! ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला
पश्चिम महाराष्ट्रातील कराड येथे ३५ हजार नोंदी आहेत, पण त्या रोखण्यात आल्या. मराठवाड्यातही तशीच स्थिती आहे. लातूर येथील चाकूर येथील समाज बांधवांच्या कुणबी नोंदी अडवून ठेवल्या आहेत. मोडी लिपीच्या कुणबी नोंदी आहेत. तहसीलदार,जिल्हाधिकारी काय करत आहे. ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला काही नको. पण कागदपत्रे असताना का अडवणूक करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपलोड केलेल्या नोंदी उडवायला लावल्याचा आरोप जरांगेंनी केला.
मराठा-कुणबी मंत्रालय लवकर स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. यासह इतर मागण्या सरकारने एकदाच पूर्ण कराव्यात. आता वारंवार तोच विषय सांगून, त्याच्या मागे लागून त्या पूर्ण करायला लावू नका. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या लढ्याला तीन वर्षे पूर्ण होत आहे. तोपर्यंत प्रलंबित सर्व मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर २९ ऑगस्टला पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
प्रसाद लाड यांच्याकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन (Manoj Jarange Patil)
राज्यात ४० हजारांच्या वर गाव, वस्ती, वाड्या आहेत. आमच्याकडे ५३ हजार मराठा सेवक आहेत. त्यांनी तात्काळ आम्हाला याविषयीची माहिती दिली आहे. याविषयीचे आदेश सरकारच्या सर्व विभागांना द्यावे लागतील. या शैक्षणिक वर्षातच त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. यावेळी उपथित असणारे आमदार प्रसाद लाड यांनी लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जरांगे दिले आहे.


