
Radhakrishna Vikhe Patil : नगर : खरी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. जे सहा खासदार फुटल्याचे सांगण्यात येते, ते आता खऱ्या शिवसेनेत गेले आहेत. शिवसेना (Shiv Sena) उध्दव ठाकरे पक्षाच्या खासदार फुटीच्या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नाही, असे भाष्य अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
नक्की वाचा : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा कारवाईचा बडगा; सहा दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल
ठाकरे सेनेचे खासदार फोडण्याशी भाजपचा संबंध नाही
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत काहीही सांगत असले तरी ठाकरे सेनेचे खासदार फोडण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. त्यांच्या पक्षात आता कोणी शिल्लक राहिलेले नसून राऊत एकटेच उरले आहेत. त्यांच्या नेत्यांना खूष करण्यासाठी ते आमच्यावर टीका करीत आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. त्याच पक्षाचा राज्यात मुख्यमंत्रीही झालेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हिंदुत्वाचे रक्षण त्यांनी केले आहे. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी फुले उधळली, तेव्हाच त्यांची शिवसेना संपली होती. त्यांनी जेव्हा काँग्रेसशी युती केली, त्याचवेळी त्यांचे हिंदुत्व संपले होते. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला याबद्दल शिकवू नये, असेही विखे पाटील म्हणाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी चर्चा (Radhakrishna Vikhe Patil)
पश्चिम बंगालविषयी बोलताना विखे पाटील म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी कुंपण घालायचे काम कारायचे होते, त्यावेळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सीमा सुरक्षा दलाला जागा दिली नव्हती. त्यांची राज्यात जर एवढी लोकप्रियता होती तर त्यांचे वीस खासदार बाहेर पडलेच नसते. त्यामुळे आता ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी चर्चा आहे, असेही विखे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील फुटीच्या चर्चेविषयी प्रश्न विचारला असता या संदर्भात आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे विखे पाटील म्हणाले.


