Omraje Nimbalkar Reaction : नगर : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याप्रकरणी तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा अखेर आज निकाल लागला. या खटल्यामुळे राजकीय वर्तुळाला वेगळं वळण लागल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल सुनावला आहे. तब्बल 20 वर्षानंतर माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. अशातच आता न्यालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता न्यालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा कारवाईचा बडगा; सहा दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल
काय म्हणाले ओमराजे?
निकालानंतर ओमराजे निंबाळकर भावूक झाल्याचं पहायला मिळालं. कोर्टाचा निकाल दुर्देवी आहे. आम्ही गेली 20 वर्ष न्यायासाठी लढत होतो. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. आता आम्ही जास्त काही बोलण्यापेक्षा उच्च न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. आमच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे. कोर्टाचा निकाल स्विकारावा लागतो. पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे आम्ही सीबीआयकडे दाद मागितली होती, असंही ओमराजे म्हणाले.
नक्की पहा : खासदार वाकचौरेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही; कोपरगाव शिंदेसेनेकडून प्रवेशाचे जाहीर समर्थन
मी अजून राजकीय भूमिका घेतली नाही (Omraje Nimbalkar Reaction)
पोलिसांनी सुरूवातीला योग्य तपास केला नव्हता. त्यामुळे योग्य ते पुरावे हाती लागले नाहीत. याचं आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. कलियुग आहे वाईटाला जास्त बळ असतं, पण चांगल्याला लवकर यश मिळत नाही, असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत. मी अजून राजकीय भूमिका घेतली नाही. या केसच्या निकालाशी माझ्या निर्णयाशी काहीही संबंध नाही, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.



