Burglary : तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास

फोन करून घरफोडी झाल्याची दिली माहिती

0
Burglary : तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास
Burglary : तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास

Burglary : पाथर्डी : तालुक्यातील टाकळीमानूर परिसरातील तांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराची मागील भिंत फोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा एकूण एक लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. याबाबत दादासाहेब गोपीनाथ तांबे (वय ३०, रा. तांबेवाडी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. 

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हरित करण्यासाठी वृक्ष लागवडीची अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

फोन करून घरफोडी झाल्याची दिली माहिती

तांबे हे कडा (ता. आष्टी) येथील एका पतसंस्थेत सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी लोकांकडून आणलेले एक लाख रुपये व घरातील २५ हजार रुपये असे एकूण १ लाख २५ हजार रुपये घरातील लोखंडी पेटीत ठेवले होते. दरम्यान, २२ जून रोजी रात्री ते कामानिमित्त कडा येथेच मुक्कामी होते. आज (ता.२३) पहाटे वडिलांनी फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोरीचा गुन्हा दाखल (Burglary)

घरी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता घराच्या मागील बाजूची कच्च्या विटांची भिंत फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे आढळले. घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ५ ग्रॅम कानातील सोन्याची रिंग, २ ग्रॅम मणीमंगळसूत्र तसेच एक लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.