
Radhakrishna Vikhe Patil : राहाता : अमली पदार्थ (Narcotics) मुक्त देश करण्यासाठी सुरू झालेल्या मोहीमेत भाजयुमोने सुध्दा पुढाकार घ्यावा.केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशभर यासाठी मोहीम सुरू केली आहे.राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत कडक धोरण घेतले असून,”युवा शक्ती जागर” यात्रेतून भाजयुमोने राज्य नशामुक्त करण्याचा संदेश युवकांमध्ये पोहचविण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा : घोडेगाव येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाबाबात ८ जुलैपर्यंत हरकती-सूचना पाठवाव्यात
जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या “युवा शक्ती जागर” यात्रेचे शुक्रवारी (ता. २६) शिर्डीत आगमन झाले.यानिमित्ताने आयोजित केलेल्या युवा मोर्चाच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील यांनी युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,सरचिटणीस अशोक पवार भाजयुमोचे उतर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहित चौधरी, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, भाजपाचे शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर,यांच्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्वांच्या प्रयत्नांची गरज (Radhakrishna Vikhe Patil)
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त करून दाखवला.आता अमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी त्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. देशाच्या सामाजिक व्यवस्थेला अमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करीत आहेत. याविरोधातील मोहीम यशस्वी करायची असेल तर, सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, युवकांमध्ये जावून यासाठी प्रबोधन करावे लागेल.युवा मोर्चाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न व्हावेत आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख
आज देश एक परीवर्तनाच्या काळातून जात आहे. तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. त्यामुळेच देशातील युवा शक्तीला पुढे घेवून जाण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असून,देशाची युवा शक्ती म्हणजे बौध्दीक आणि उर्जासंपन्न शक्ती असल्याचे सांगून,मागील बारा वर्षात सर्वाधिक स्टार्ट अप,मेक इन इंडीया आणि डिजिटल इंडियाच्या प्रक्रीयेत युवा शक्तीला मोठे स्थान मिळाले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
उद्योगाची उभारणी ही देशातील युवाशक्तीचे बलस्थान
आज राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योगाची गुंतवणुक येत आहे.याचा उपयोग युवकांनाच होणार आहे.अहील्यानगर जिल्हा सुध्दा डिफेन्स उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहेत.आत्मनिर्भर भारत योजनेतून सुरू असलेली उद्योगाची उभारणी ही देशातील युवाशक्तीचे बलस्थान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यत घेवून जाण्याची मोठी जबाबदारी भाजयुमोवर आहे.सरकारचे काम समाजात सांगण्यास आपण कमी पडतो म्हणूनच काही शक्ती डोके वर काढून युवकांमध्ये वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात.पण आशा प्रवृतींना जनाधार नसतो.
राज्याच्या सांस्कृतिक. अध्यात्मिक परंपरांची माहीती करून देण्याचा प्रयत्न
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडिक यांनी आपल्या भाषणात यात्रेमागील उद्देश विषद करताना सांगितले की, तरुणांना राष्ट्रीय विचारांच्या प्रवाहात आणताना राज्याच्या सांस्कृतिक. अध्यात्मिक परंपरांची माहीती करून देण्याचा प्रयत्न आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेची माहीती युवकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


