Railway Route : नगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील रेल्वे मार्गासंबंधीच्या (Railway lines) विविध प्रश्नांसाठी आता या नगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांतील आमदार एकवटले आहेत. यासाठी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. ३०) मुंबईत पुणे व नगर जिल्ह्यातील संबंधित आमदारांची बैठक झाली. या प्रश्नांसाठी राज्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, यासाठी हे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहे.
नक्की वाचा : नेहरू मार्केटचा पेच, भाजी विक्रेत्यांना हवीय तळमजल्यावरच जागा, अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा
यांचा बैठकीत सहभाग
नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे आणि राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग या विषयावर झालेल्या या बैठकीसाठी आमदार माणिकराव कोकाटे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, विठ्ठल लंघे, शिवाजी आढळराव पाटील, सत्यजित तांबे, प्राजक्ता तनपुरे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले उपस्थित होते. तर माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभाग घेतला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार (Railway Route)
मंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबतही या रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळही दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईल. हा रेल्वे मर्ग नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रेल्वे मार्गामुळे एक वेगवान संपर्क जोडणी पुणे ते नाशिक या दोन महानगरा दरम्यान निर्माण होईल. त्यामुळे राज्याचाही गतीने विकास होईल. पुणे नासिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत जनतेच्या भावना विचारात घेवून या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेण्याची सूचना
राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या संदर्भात असलेल्या या रेल्वे मार्गाच्या बाबतीत बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नाबाबत शेतकर्याच्या असलेल्या भावना मुख्यमंत्र्याच्या निदर्शानास आणून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीत सहभाग घेताना सांगितले की, पुणे नासिक रेल्वे प्रकल्पाच्या संददर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून जीएमआरटीच्या अडचणी दूर होवू शकतात ही बाब त्यांच्या निदर्शानास आणून दिली आहे. काही देशांमध्ये आशा पध्दतीच्या अडचणी असताना रेल्वे मार्गाची काम झाली असल्याचा दाखला देवून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेण्याची सूचना त्यांनी केली.



