Pathardi News : पाथर्डी : शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या जागेचा मोबदला २५ वर्षांपासून न मिळाल्याने शेतकऱ्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकले (School locked up) असल्याची घटना तालुक्यातील जांभूळवाडी (Jambulwadi) येथे घडली आहे. १५ जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून एकनाथवाडी येथील जांभूळवाडी प्राथमिक शाळा (Primary School) अद्याप बंद असल्यामुळे उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
नक्की वाचा : आरोपींना अटक न झाल्याने रास्ता रोको; माळीबाभुळगाव ग्रामस्थ आक्रमक
गायगोठा व विहीर मंजूर करण्याचे लेखी आश्वासन
जांभूळवाडी येथे २००० साली जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. मात्र, शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या जागेचा मोबदला २५ वर्षानंतरही मिळालेला नाही. यापूर्वी मोबदल्यासाठी शेतकऱ्याने तीन दिवस उपोषण केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी गायगोठा व विहीर मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले, परंतू आजवर त्यांना कोणत्याही योजनेचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे अखेर शेतकऱ्याने नाराजी व्यक्त करीत थेट शाळेला कुलूप लावले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गावकऱ्यांची तोडगा काढण्याची मागणी (Pathardi News)
स्थानिक प्रशासन, गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी. शेतकऱ्यांना मोबदला व विद्यार्थ्यांचे शिक्षण या दोन्ही बाबींवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने कार्यवाही करणे गरजेचे आहे, अन्यथा शाळा सुरू होईपर्यंत आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, एकनाथवाडी येथील अंगणवाडी मदतनीस पदभरतीतही राजकीय हस्तक्षेप करून नियम डावलले गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दिव्यांग महिलेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, तक्रार अर्ज देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे.



