Mula Dam : राहुरी : मुळा धरण (Mula Dam) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे (Due to Rainfall) दोन छोटी धरणे भरल्यानंतर आज प्रथमच धरणात नवीन पाणी आले. आज (ता.४) सकाळी ६ वाजता धरणात १३१३ क्युसेक्स ने पाण्याची आवक (Water Inflow) सुरू झाली. त्यानंतर दुपारी ३वाजता आणखी आवक वाढून ही आवक १७३३ झाल्याने धरणात नव्याने पाणी यायला सुरुवात झाली.
नक्की वाचा : राहुरी–शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करावा; आमदार कर्डिले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गेल्या दोन दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस
शेतकरी तसेच नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे धरणाचा पाणीसाठा यावर्षी अत्यंत खालावला आहे. धरण खपाटीला गेल्याने जिल्ह्यातील पाणीयोजना काही दिवस चालतील अशी स्थिती तयार झाली होती .पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत असताना आणि पाण्याची गरज वाढत असताना पाणी संकट तयार झाले होते. मात्र वरुण राजाच्या कृपेने गेल्या दोन दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात नवीन पाणी जमा होऊ लागल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकूण ६३७८ दशलक्ष पाणीसाठा शिल्लक (Mula Dam)
सध्या धरणात फक्त १८७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वापरण्यायोग्य शिल्लक असून मागील एकूण पाणीसाठा ६३७८दशलक्ष पाणी धरणात शिल्लक आहे. मात्र यापैकी मृत पाणीसाठा ४५००दशलक्ष पाणी साठा असल्याने वापरात येणारे पाणी १८७८ दशलक्ष असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढलेली होती. आज दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी बरसत होत्या.



