Alandi Flood News : इंद्रायणीला पूर, माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

0
Alandi Flood News : इंद्रायणीला पूर, माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Alandi Flood News : इंद्रायणीला पूर, माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नगर : राज्यभरात आज पावसाचा कहर (Torrential rain) पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु आहे. नदी- नाल्यांसह बहुतांश भाग जलमय झाला आहे. तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तविण्यात आला आहे. अशातच आळंदीत (Alandi Flood News) येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : देशातील ५८ इंजिनीअरिंग महाविद्यालयांना कुलूप का? विद्यार्थ्यांचं काय होणार? 

पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या प्रचंड पावसामुळे इंद्रायणीला पूर आला आहे. परिणामी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

‘आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका’ (Alandi Flood News)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहे, तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. अशा सूचना दिल्या आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे (Alandi Flood News)

कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

आषाढी वारीसाठी सगळ्यात मोठा पालखीतळ असणाऱ्या पंढरपूर जवळच्या वाखरी पालखी तळावर धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे काढून तब्बल दीड एकर जागा मोकळी करण्यात वाखरी ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले आहे. या दीड एकर जागेवर मुख्यमंत्री सुविधा केंद्राच्या माध्यमातून वारकरी भक्तांना वास्तव्याची सेवा निर्माण होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेतून झालेल्या दीड एकर जागेचा लाभ वारकरी भक्तांना होईल.