Mula Dam : राहुरी : २६००० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात (Mula Dam) दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने पाण्याची आवक वाढली आहे. आज दुपारी तीन वाजता कोतूळ (Kotul) येथे या हंगामातील विक्रमी ३७८७५ क्युसेस आवक झाल्याची माहिती शाखा अभियंता राजेंद्र पारखे (Rajendra Parkhe) यांनी दिली.
नक्की वाचा : राज्यातील बहुतांश भागांमध्ये आठ जुलैपासून पावसात घट
पाण्यात सातत्याने वाढ
सहा जुलै पासून पाण्यात सातत्याने वाढ होत आहे .सहा जुलैला सकाळी सहा वाजता ६४०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता .त्यावेळी पाण्याची आवक ६२६० क्युसेस होती .सायंकाळी सहा वाजता ६४६९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. त्यावेळी पाण्याची आवक १८७२४ क्युसेस होती. आज (ता. ७) सकाळी सहा वाजता पाणीसाठा ७२२६ दशलक्ष घनफूट होता. त्यावेळी पाण्याची आवक १३८२६ क्युसेस होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१२४८ दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक (Mula Dam)
दुपारी बारा वाजता पाण्याची आवक वाढून ती २९५३३ क्यूसेस झाली तर दुपारी तीन वाजता ही आवक ३७८७५ क्युसेस इतकी झाली. दुपारी तीन वाजता धरणात पाणीसाठा ७६०५ दशलक्षघनफूट होता. पाण्याची आवक ३७८७५ एवढी विक्रमी होती. या हंगामात आत्तापर्यंत १२४८ दशलक्ष घनफूट पाणी नव्याने आले आहे. राहुरीत संततधार रिमझिम स्वरूपात पाऊस पडत राहिला सकाळपासून सुरू झालेला पाऊस अधून मधून थांबत होता आणि थोड्याशा विश्रांतीनंतर रिमझिम स्वरूपात पाऊस दिवसभर बरसत होता. संततधार पावसाने वातावरणात थंडावा आला आहे



