Ind vs Eng : भारताचा लाजिरवाणा पराभव; टी- २० मालिकेत इंग्लंडची आघाडी 

0
Ind vs Eng : भारताचा लाजिरवाणा पराभव; टी- २० मालिकेत इंग्लंडची आघाडी
Ind vs Eng : भारताचा लाजिरवाणा पराभव; टी- २० मालिकेत इंग्लंडची आघाडी

Ind vs Eng : नगर : तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर १२५ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने २० ओव्हरमध्ये २०१ धावा केल्या होत्या. भारताचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर अवघ्या ७६ धावांवर ऑल आऊट झाला. भारताचा टी-२० इतिहासातील धावांनी झालेला सर्वात मोठा पराभव तर भारतीय संघाची टी-२० मधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली.

हेही वाचा : महावितरण कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभार; लोकप्रतिनिधींच्या प्रवेशद्वारावरच फांद्यांचा ढीग

प्रिन्स यादवला संधी 

इंग्लंडने २०० धावांची मजल मारली. फिल साल्टच्या ७० धावा आणि सॅम करनच्या ४१ धावांनी हे शक्य झाले. त्यासोबतच जोस बटलरनेही ३६ धावांची खेळी करत इंग्लंडला सुरूवात करून दिली होती. विल जॅक्सने दोन षटकार मारत १४ धावा करत २०० धावांच्या आसपास पोहोचवले. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताने प्रिन्स यादवला प्लेइंग ११ मध्ये जागा दिली होती. प्रिन्स यादवनेच इंग्लंडच्या पहिल्या दोन विकेट नावावर केल्या होत्या. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केल्या.

नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी

आक्रमणाच्या नादात विकेट (Ind vs Eng) 

या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवातच खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा १० धावांवर आऊट झाला. वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक १३ धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार मारले खरे पण तो जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर आऊट झाला. वैभव आऊट झाल्यावर कोणीच मैदानात थांबले नाही, सर्वांनीच आक्रमण करण्याच्या नादात विकेट गमावल्या. भारताचा संघ ११.४ ओव्हरमध्ये ७६ धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जोश टंगने सर्वाधिक ४ विकेट तर जोफ्रा आर्चरने ३ विकेट आणि आदिल राशिदने दोन विकेट नावावर केल्या. पाच सामन्यांच्या टी- २० मालिकेत इंग्लंडने आता २-० अशी आघाडी घेतली आहे.