
Women Health Tips अहिल्यानगर : सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, या बदलत्या हवामानामुळे (Monsoon Skin Infection) महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे आणि वाढत्या आर्द्रतेमुळे (Humidity) महिलांना गुप्तांगांचे संसर्गाचा (Genital Infection) सामना करावा लागत असून, खाज सुटणे, रॅशेस येणे आणि यूरिन इन्फेक्शन (UTI) यांसारखी लक्षणे दिसत आहेत. या गंभीर विषयावर (Women Health Tips) चा आधार घेत, खाजगी भागांची योग्य स्वच्छता (Intimate Hygiene) कशी राखावी आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा सविस्तर अहवाल आणि तज्ज्ञांचा सल्ला खालीलप्रमाणे…
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी
संसर्ग वाढण्यामागचे मुख्य कारण काय?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असते. या दमट वातावरणामुळे शरीराला जास्त घाम येतो. त्यातच पावसात भिजल्यामुळे किंवा हवेत ओलसरपणा असल्यामुळे कपडे, विशेषतः अंतर्वस्त्रे पूर्णपणे वाळत नाहीत. अशा ओलसर आणि उबदार वातावरणात फंगस आणि बॅक्टेरियाची वाढ अत्यंत वेगाने होते. महिलांमध्ये शारीरिक रचनेमुळे आणि मासिक पाळीच्या काळात योग्य काळजी न घेतल्यास हा संसर्ग वेगाने पसरतो.
नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका
ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध! (Women Health Tips)
सुरुवातीच्या काळात अनेक महिला संसर्गाच्या लक्षणांकडे लज्जेपोटी किंवा किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. प्रामुख्याने दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
१. त्वचेवर लालसरपणा येणे, तीव्र खाज सुटणे किंवा रॅशेस (पुरळ) उठणे.
२. गुप्तांगाच्या भागात जळजळ होणे किंवा सतत खाज येणे.
३.पांढरा, पिवळसर किंवा दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज (White Discharge) होणे.
१. लघवी करताना तीव्र वेदना किंवा जळजळ जाणवणे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘सेल्फ मेडिकेशन’ पडू शकते महागात! (Women Health Tips)
स्त्रीरोगतज्ज्ञांनी (Gynecologists) याबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, “अनेक महिला लक्षणे दिसू लागल्यावर स्वतःच मेडिकल स्टोअरमधून एखादे क्रीम किंवा औषध आणून वापरतात. तात्पुरता आराम मिळत असला, तरी यामुळे मूळ आजार बरे होत नाहीत; उलट इन्फेक्शन अधिक गंभीर रूप धारण करते. काही प्रक्रियेत संसर्ग गर्भाशयापर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे पूर्णपणे टाळावे.”
संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी (तज्ज्ञांचा सल्ला): (Women Health Tips)
पावसाळ्याच्या दिवसांत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांनी दिनचर्येत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे:
१. कपड्यांची निवड आणि वाळवण्याची पद्धत : पावसाळ्यात कपडे वाळण्यास अडचण येते. अशा वेळी अंतर्वस्त्रे घरात किंवा कमी उन्हात वाळू घालण्याऐवजी ती पूर्ण वाळल्यानंतर त्यांना व्यवस्थित ‘इस्त्री’ करून वापरावे. उष्णतेमुळे त्यातील सुप्त जंतू नष्ट होतात. तसेच शक्यतो सुती आणि सैल कपड्यांचा वापर करावा, जेणेकरून त्वचेला हवा मिळेल.
२. स्वच्छतेची योग्य दिशा : वैयक्तिक स्वच्छता राखताना महिलांनी नेहमी पुढून मागे या दिशेने स्वच्छता करावी. उलट दिशेने स्वच्छता केल्यास गुदद्वाराजवळील बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात, ज्यामुळे यूरिन इन्फेक्शनचा धोका वाढतो.
३. आहार आणि प्रोबायोटिक्सचा समावेश: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती बळकट ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. आहारात दह्याचा आवर्जून समावेश करावा. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात, जे नैसर्गिकरित्या संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करतात.
४. ओले कपडे त्वरित बदला: पावसात भिजल्यास किंवा जास्त घाम आल्यास उशीर न करता त्वरित कपडे बदलावे. प्रायव्हेट पार्ट सुकवण्यासाठी सुगंधी साबण, केमिकल स्प्रे किंवा पावडरचा अतिवापर टाळावा, कारण यामुळे त्वचेचा नैसर्गिक पीएच (pH) बिघडून संसर्ग वाढू शकतो.
हे वाचा – रेहेकुरी अभयारण्य परिसरात सापडली कोळ्याची अत्यंत दुर्मिळ ‘नवी’ प्रजाती
डॉक्टरांकडे कधी जावे?
जर खाज, जळजळ किंवा डिस्चार्जचा त्रास २ ते ३ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला, लघवी करताना जास्त वेदना होत असतील किंवा संसर्गासोबत ताप आला असेल, तर घरगुती उपाय न करता त्वरित तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू करावेत. पावसाळ्यात योग्य सजगता आणि छोटीशी काळजी घेतली, तर हे संसर्ग सहज टाळता येणे शक्य आहे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


