Action taken by the City Traffic Branch : वाहतूक नियमाचे उल्लंघन ५५ वाहनांवर कारवाई; शहर वाहतूक शाखेची कारवाई

Action taken by the City Traffic Branch : वाहतूक नियमाचे उल्लंघन ५५ वाहनांवर कारवाई; शहर वाहतूक शाखेची कारवाई

0

Action taken by the City Traffic Branch : नगर : अहिल्यानगर शहरात विना नंबर प्लेट (Vehicles without number plates), ट्रिपल सीट, ब्लॅक फिल्म विरोधात शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा (Action taken by the City Traffic Branch) बडगाव उभारण्यात आला आहे. शहरातील डी एसपी चौकात शहर वाहतूक शाखेच्या (City Traffic Branch) वतीने नाकाबंदी करण्यात आली होती.

नक्की वाचा : नेवाशात माऊलींच्या मंदिरामागे वाळू चोरी, पोलिसांच्या छाप्यात एकाला अटक

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई शहर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामराव शिरसाट, मन्सूर सय्यद पोलीस अंमलदार बापू उंडे, गणेश कर्डिले, सतीश दळवी, प्रवीण खंडागळे, यांच्या पथकाने केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

५५ हजार रुपयांचा दंड (Action taken by the City Traffic Branch)

अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात नाकाबंदी दरम्यान फॅन्सी नंबर प्लेट फॉर तीन वाहनांवर तीन हजाराचा दंड करण्यात आला आहे. विना नंबर असलेल्या अकरा वाहनांवर 11 हजारांचा दंड, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर आठ हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच विना लायसन ब्लॅक फिल्म अशा सहा वाहनांवर सुमारे 9 हजाराचा दंड असा एकूण ५५ वाहनांवर ५५ हजार रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आला आहे. वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.