RTO : अहिल्यानगर RTO मध्ये ‘हप्तेवसुली’चे रॅकेट; भाजप पदाधिकाऱ्याच्या संरक्षणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

RTO : अहिल्यानगर RTO मध्ये 'हप्तेवसुली'चे रॅकेट; भाजप पदाधिकाऱ्याच्या संरक्षणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

0
RTO : अहिल्यानगर RTO मध्ये 'हप्तेवसुली'चे रॅकेट; भाजप पदाधिकाऱ्याच्या संरक्षणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
RTO : अहिल्यानगर RTO मध्ये 'हप्तेवसुली'चे रॅकेट; भाजप पदाधिकाऱ्याच्या संरक्षणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

RTO : नगर : अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) कथित भ्रष्टाचाराचा एक मोठा गैरप्रकार समोर आला असून, अवैध जडवाहतुकीला राजकीय संरक्षण देऊन कोट्यवधींचे हप्तेवसुली रॅकेट चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला आहे. अहिल्यानगरमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यामार्फत हे हप्ते गोळा करून आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात आणि याच आर्थिक व्यवहारामुळे नियमबाह्य धावणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा दावा भुतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

नक्की वाचा : श्रीकांत दोंदे हत्येप्रकरणी विविध संघटना आक्रमक; राहुरी विद्यापीठासमोर रास्ता रोको

दलालांचे मोठे जाळे सक्रिय

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खराब होत असून सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि परवान्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून दलालांचे मोठे जाळे सक्रिय ठेवण्यात आले आहे. यापूर्वी विधानभवनातही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरटीओच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले होते, याची आठवण भुतारे यांनी करून दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आर्थिक चौकशीची मागणी (RTO)

या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आर्थिक चौकशी करून संशयित अधिकारी आणि नेत्यांचे बँक व्यवहार तपासावेत, तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नितीन भुतारे यांनी दिला आहे.