
Sewage pipeline burst : कर्जत : रस्ता डांबरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) डागडुजी मुरुमाची केली. यावर विशेष कहर म्हणजे तो मुरूम दाबताना रोलरच्या दाबाने अंतर्गत गटाराची पाईपलाईन फुटल्याने (Sewage pipeline burst) कर्जत शहराच्या मुख्य रस्त्यावर आज (ता. १४) दुपारी घाण पाणी पसरल्याने पाच ते सहा दुचाकी चालक घसरून पडले. गुरुवारी (ता. १६) संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Saint Nivruttinath Maharaj) यांचा पालखी सोहळा कर्जत शहरात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यवस्थापन केले की ? येणाऱ्या भाविकांची गैरसोय? हा प्रश्न अनुत्तरित राहिला.
नक्की वाचा : मुख्यमंत्र्यांच्या तीनशे कोटी वृक्षलागवड अभियानात विद्यार्थी, नागरिक, संघटनांनी सहभागी व्हावे : पळसकर

पावसात खड्ड्यांची अधिकच दुर्दशा
कर्जत शहरातून अहिल्यानगर-बारामती हा महामार्ग जातो. या महामार्गावर शेकडो वाहने आवक-जावक करीत असून संत सदगुरु गोदड महाराज प्रवेशद्वार ते भांडेवाडीच्या परिसरात या मार्गावर अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसात या खड्ड्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून या मार्गावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक-भक्त कर्जातून करमाळा मार्ग पंढरपूरकडे जाणार आहे. तसेच गुरुवार, (ता. १६) रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी रथ कर्जतमध्ये येणार असून यासाठी तालुका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू देखील आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वाहने घसरल्याने चालकांना लहान-सहान दुखापती (Sewage pipeline burst)
मात्र कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराच्या मुख्य डांबरी रस्त्यावर चक्क लालमाती मिश्रित मुरूम टाकला. यावर कहर म्हणजे तो मुरूम दाबताना रोलरचा वापर करण्यात आला. रोलरच्या दाबाने रस्त्यावर अंर्तगत असणारी गटारचा पाईप फुटला आणि मैलमिश्रित पाणी चक्क रस्त्यावर वाहू लागले. काही काळातच हे पाणी मुख्य रस्त्यावर पसरत मुरूम टाकलेल्या ठिकाणी चिखल झाला. या चिखलात दुचाकी वाहने घसरल्याने चालकांना लहान-सहान दुखापतीस सामोरे जावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती करीत दिलासा दिला की ? सर्वसामान्य नागरिकांची आणखी अडचण वाढवली हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (ता. १६) कर्जत शहरात येणार असून स्थानिक तालुका प्रशासनाने यावर योग्य व तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्य कर्जतकरांनी व्यक्त केली.


