Extension : शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ

0
Extension : शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ
Extension : शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ

Extension : नगर : समाज कल्याण आयुक्तालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृहात इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २२ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

मागण्यांचा विचार करून निर्णय

यापूर्वी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ पर्यंत होती. मात्र विविध विद्यार्थी संघटना, विद्यार्थी व क्षेत्रीय कार्यालयांकडून मुदत वाढवून मिळण्याबाबत आलेल्या मागण्यांचा विचार करून आयुक्तालयाने हा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपली असून त्यात कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्व अर्जांची छाननी (Extension)

आयुक्तालयाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी संबंधित यंत्रणेने २४ जुलै २०२६ पर्यंत तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यानंतर कोणतीही स्वतंत्र मुदतवाढ दिली जाणार नाही.