Alert : धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
Alert : धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Alert : धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Alert : नगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पाणलोट क्षेत्रात पाऊस

आज दुपारी १ वाजता भिमा नदीत दौंड पुलावरून १० हजार ९३८ क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून ४ हजार क्युसेक, तर गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४ हजार ७६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्यास भिमा, घोड आणि गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. तसेच जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गोदावरी, भिमा, घोड, प्रवरा आणि मुळा नदीकाठच्या नागरिकांनी तसेच धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

नक्की पहा : अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करा; एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन

अशी घ्या खबरदारी (Alert)

मेघगर्जना, वीज चमकणे अथवा वादळी वारे सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, धातूचे कुंपण किंवा रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या किंवा केबलपासून सुरक्षित अंतर ठेवावे. अशा वेळी कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, दुचाकी तसेच इतर विद्युत सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.