Ram Shinde : नगर : प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि महसूल सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. महसूल समाधान शिबिरातून लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
हे उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृह, दादा पाटील महाविद्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ शुभारंभ कार्यक्रमात प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर, नगराध्यक्षा छायाताई शेलार, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तहसीलदार रवी सतवन, गट विकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की पहा : अन्यायकारक बदली तात्काळ रद्द करा; एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आंदोलन
प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी (Ram Shinde)
राम शिंदे म्हणाले, शासन हे सत्तेचे नव्हे तर सेवेचे माध्यम असून प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा शासनाच्या निर्णयांचा जनतेपर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला वेळेत, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असून लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी होत असल्याचे ते म्हणाले.



