Atul Lokhande : श्रीगोंदा : शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यासाठी दूरवर जावे लागू नये, या उद्देशाने दर १५ किलोमीटरच्या अंतरावर शेती माल विक्रीची व्यवस्था बाजार समितीच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू असल्याचे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे (Atul Lokhande) यांनी सांगितले. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Srigonda Agricultural Produce Market Committee) चिंभळा उपबाजार समितीत कांदा लिलाव (Onion Auction) सुरू करण्यात आला. या वेळी पहिल्याच दिवशी सात हजार कांदा गोण्यांची आवक झाली आहे. संपूर्ण लिलाव कामकाज सचिव राजेंद्र लगड यांच्या देखरेखीखाली झाला.
नक्की वाचा : बाळासाहेब नाहाटा यांना श्रीगोंद्यातून अटक; पुण्यातील आर्थिक फसवणूक प्रकरण
पहिल्याच दिवशी सात हजार कांदा गोण्यांची आवक
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळा उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात आला. या वेळी पहिल्याच दिवशी सात हजार कांदा गोण्यांची आवक झाली आहे. बाजार समितीत आलेल्या कांद्याला प्रती किलोप्रमाणे मोठा कांदा ३० रुपये, दोन नंबर (मध्यम) कांदा २७ ते २८ रुपये, तीन नंबर कांदा २५ रुपये तर लहान (गोल्टी) कांदा २३ ते २४ रुपये किलो प्रमाणे लिलाव होऊन कांद्याचे त्याच दिवशी रोख पेमेंट शेतकऱ्यांना देण्यात आले. या लिलावात परिसरातील विविध गावांमधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काष्टी येथेही कांदा बाजार पूर्ण क्षमतेने सुरू (Atul Lokhande)
पुढे बोलताना लोखंडे यांनी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पेडगाव येथील केंद्र अधिक सक्षम करून कार्यान्वित केले जाईल. तसेच पुढील दीड महिन्यात काष्टी येथेही कांदा बाजार पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा आमचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि वेळेवर पेमेंट देणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगितले. यावेळी दिलीप मेहता, मयूर बोरा, दीपक भंडारी, गौरव पोखरणा यांच्यासह व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवला. पारदर्शक व्यवहार आणि रोख पेमेंटच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. यावेळी संचालक रामदास झेंडे, लौकिक मेहता यांच्यासह संचालक, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.



