Murder | मुकूंदनगर येथील खुनातील तीन मुख्य आरोपी हैदराबादमधून ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

Murder | नगर : मुकूंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे झालेल्या खुनाच्या ( Murder )  प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या तीन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत हैदराबाद, तेलंगणा येथून ताब्यात घेतले. तसेच आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय 20), मेहराज इब्राहिम सय्यद (वय 22) आणि सिराज इब्राहिम सय्यद (वय 21), सर्व रा. आलमगीर मदरसाजवळ, भिंगार, अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.

हे वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ( Murder )

शुक्रवारी (ता. ७) रोजी सायंकाळी फिर्यादी अक्षय कैलास मुळे, रा. शिवालय पार्क, बोल्हेगाव, ता. अहिल्यानगर हे धीरज कचरूसिंग रजपूत (परदेशी) यांच्यासोबत दर्गादायरा, मुकूंदनगर येथे लाईटचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकीम अस्लम सय्यद, युनूस शेख तसेच इतर 2 ते 3 अनोळखी व्यक्तींनी धीरज कचरूसिंग रजपूत यांना लाकडी बल्ला व लोखंडी पाइपने मारहाण केली. ‘इसको मार डालो’ असे म्हणत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

पथक तयार करण्यात आले ( Murder )

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न  गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला फरार आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिष भोये, पोउपनि कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, राहुल डोके, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, राहुल द्वारके, रमिझराजा आतार, अरूण मोरे, अभिजीत अरकल आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे सपोनि कल्पेश चव्हाण व पोलीस अंमलदार कैलास राठोड यांचे पथक तयार करण्यात आले.

पथकाने अहिल्यानगर शहर व भिंगार कॅम्प परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी मुस्तकीम खाजामिया सय्यद हा साथीदारांसह हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हैदराबाद येथे रवाना झाले. हैदराबाद सिटीच्या कमिशनर टास्क फोर्स, खैराटाबाद झोन यांच्या मदतीने शहरात शोधमोहीम राबवून मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय 20), मेहराज इब्राहिम सय्यद (वय 22) आणि सिराज इब्राहिम सय्यद (वय 21), सर्व रा. आलमगीर मदरसाजवळ, भिंगार, अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, दर्गादायरा, मुकूंदनगर येथे धीरज कचरूसिंग रजपूत यांना लाकडी बल्ला व लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती त्यांनी दिली. मारहाणीनंतर छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने हैदराबादला गेल्याचेही आरोपींनी सांगितले. तसेच हैदराबादला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांची चौकशी केली असता ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद (वय 52, रा. आलमगीर, अहिल्यानगर) आणि वसीम रहिम सय्यद (वय 47, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा, मुकूंदनगर, अहिल्यानगर) यांनी मदत केल्याचे समोर आले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या पाचही आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here