Illegal Sand Transportation : प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेकडून पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त

Illegal Sand Transportation : प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेकडून पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त

0

Illegal Sand Transportation : नगर : प्रवरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा (Illegal Sand Transportation) करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई केली. या कारवाईत विनाक्रमांकाचा टेम्पो आणि वाळूसह एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन जणांना घेण्यात आले ताब्यात

याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रोहित बाळासाहेब राऊत (वय २६) आणि वाहनमालक अभिजीत बाळासाहेब राऊत (वय २४), दोघेही रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर यांना ताब्यात घेण्यात आले. या बाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून कारवाई सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नदीपात्राजवळ सापळा रचून कारवाई (Illegal Sand Transportation)

दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रणजीत जाधव तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील आर. डी. ढोकणे व विनोद उंडे हे अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. भेर्डापूर येथील एक व्यक्ती प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष नदीपात्राजवळ सापळा रचला.