Virbhadreshwar Mahadev Temple : राहाता येथील विरभद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण

0
Virbhadreshwar Mahadev Temple : राहाता येथील विरभद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
Virbhadreshwar Mahadev Temple : राहाता येथील विरभद्रेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी

Virbhadreshwar Mahadev Temple : राहाता : श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त (Shravani Monday) ग्रामदैवत श्री. विरभद्र देवालय ट्रस्टचे श्री.विरभद्रेश्वर महादेव मंदिरात (Virbhadreshwar Mahadev Temple) भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी वर्दळ (Crowd) सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात भाविकांनी महादेवाचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना पोलीस पदक जाहीर; २६ कर्मचाऱ्यांचाही होणार विविध पदकांनी सन्मान

मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारनिमित्त श्री विरभद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी महिला भक्तांबरोबरच, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने महादेवाचे दर्शन घेतले. भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली. अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचे व्रत करून मंदिरात येत महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात सकाळपासूनच धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ट्रस्टचा ‘क’ वर्गमध्ये सामावेश (Virbhadreshwar Mahadev Temple)

श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने पहिल्या सोमवारला मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही भाविकांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून महादेवाची आराधना केली. मंदिर परिसरात विविध धार्मिक साहित्य व पूजेचे साहित्य घेण्यासाठीही भाविकांची गर्दी झाली होती.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, माजी अध्यक्ष साहेबराव निधाने तसेच ट्रस्टचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व गावकऱ्यांनी विशेष मदत केली आहे. तसेच या ट्रस्टचा क वर्ग मध्ये सामावेश झाल्या असल्याकारणाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे.

मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन

श्री.वीरभद्र देवालयच्या वतीने तिसऱ्या सोमवारी रुद्रपूजा (अभिषेक) व साबुदाणा खिचडीचा महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या रुद्रपूजा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. मंदिर परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले. दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहिल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रावण महिन्यातील पुढील सोमवारनिमित्तही श्री विरभद्रेश्वर महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. पहिल्या श्रावणी सोमवारला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेत ‘हर हर महादेव’चा जयघोष करत धार्मिक उत्साहात दिवस साजरा केला.