Promotion : जितेंद्र इंगळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; श्रीगोंद्याच्या सुपुत्राचे सर्व स्तरांतून अभिनंदन

0
Promotion : जितेंद्र इंगळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; श्रीगोंद्याच्या सुपुत्राचे सर्व स्तरांतून अभिनंदन
Promotion : जितेंद्र इंगळे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; श्रीगोंद्याच्या सुपुत्राचे सर्व स्तरांतून अभिनंदन

Promotion : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील खांडगावचे सुपुत्र तथा पनवेल, जिल्हा रायगड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र मारुती इंगळे पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र शासनाने तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना नुकतीच उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली असून, त्यामध्ये जितेंद्र इंगळे पाटील यांचा समावेश आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उल्लेखनीय कामगिरीची दखल

जितेंद्र इंगळे यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत अहिल्यानगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, तसेच नांदेड, कोल्हापूर, सटाणा (नाशिक) आणि पनवेल येथे तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून, त्यांना मानांकित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

नक्की वाचा : कौठेमलकापूरच्या प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्पाला विरोध

विविध स्तरांतून अभिनंदन (Promotion)

प्रशासकीय सेवेत कर्तृत्व, मेहनत आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी मिळवलेल्या या पदोन्नतीमुळे श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समस्त श्रीगोंदेकर तसेच शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन, श्रीगोंदा यांच्या वतीने जितेंद्र इंगळे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.