Happy Family, Prosperous Village : ‘आनंदी कुटुंब, समृद्ध ग्राम’ उपक्रमामुळे हिवरे बाजार बनले देशासमोर रोल मॉडेल

हिवरे बाजार गावाने आर्थिक आणि सामाजिक पातळीवर केलेली प्रगती आश्चर्यकारक

0
Happy Family, Prosperous Village : 'आनंदी कुटुंब, समृद्ध ग्राम' या उपक्रमामुळे हिवरे बाजार बनले देशासमोर रोल मॉडेल
Happy Family, Prosperous Village : 'आनंदी कुटुंब, समृद्ध ग्राम' या उपक्रमामुळे हिवरे बाजार बनले देशासमोर रोल मॉडेल

Happy Family, Prosperous Village : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार (Hiware Bazar) हे गाव विकासासाठी, जलसंधारणासाठी आणि आदर्श सामाजिक नियमांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ‘आनंदी कुटुंब, समृद्ध ग्राम’ (Happy Family, Prosperous Village) हा उपक्रम याच विकास मॉडेलचा एक मुख्य भाग असून, ज्याचा उद्देश केवळ आर्थिक प्रगती न करता गावातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक समृद्धी वाढवणे हा आहे. पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्या नेतृत्वाखाली गावाने हा उपक्रम राबवून संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये पत्रकारावर हल्ला; वाहनाचा धक्का लागल्याच्या वादातून १० ते १२ जणांकडून मारहाण

पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम

आनंदी कुटुंब समृद्ध ग्राम’ उपक्रम हा प्रामुख्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबवला जाणारा एक महत्त्वाचा प्रशिक्षण व विकासात्मक उपक्रम आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब स्वावलंबी बनवणे आणि पर्यायाने संपूर्ण गाव समृद्ध करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावाने हा उपक्रम राबवून संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नियम आणि तत्त्वांचे काटेकोरपणे पालन (Happy Family, Prosperous Village)

या उपक्रमांतर्गत कुटुंबाला केंद्रबिंदू मानून गावाचा विकास साधण्यासाठी खालील सात प्रमुख नियम आणि तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

सामाजिक सुरक्षा व आरोग्य- गावातील महिला आणि बालकांसाठी सामाजिक सुरक्षा सुधारणे आणि कुटुंबांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

कुटुंब नियोजन आणि आरोग्य- लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने कुटुंब नियोजन स्वीकारणे अनिवार्य आहे. तसेच, विवाहापूर्वी वधू-वरांची HIV/AIDS तपासणी करणे बंधनकारक करणारी ही पहिली ग्रामपंचायत आहे.

व्यसनमुक्ती (दारूबंदी)- गावात दारू, गुटखा आणि इतर अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर पूर्णपणे बंदी आहे. यामुळे कौटुंबिक वाद थांबून कुटुंबांमध्ये ‘आनंदी’ वातावरण निर्माण झाले.

कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी- पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे तोडण्यावर आणि मोकळ्या चराईवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे डोंगर हिरवेगार झाले असून चारा टंचाई कायमची दूर झाली आहे.

श्रमदान- गावातील विकासकामांसाठी (उदा. बंधारे बांधणे, स्वच्छता करणे) प्रत्येक कुटुंबातील सदस्याने श्रमदान करणे आवश्यक आहे. यामुळे गावात एकोपा आणि ‘समृद्धी’ वाढली.

पाण्याचे योग्य नियोजन- गावाने स्वतःचे ‘वॉटर ऑडिट’ सुरू केले आहे. जास्त पाणी लागणारी पिके (उदा. ऊस, केळी) घेण्यावर बंदी असून, कमी पाण्यात येणारी पिके आणि ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.

स्त्री-पुरुष समानता व मुलींचे शिक्षण- गावात महिलांना निर्णयप्रक्रियेत समान हक्क आहेत. कुटुंबातील दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या शिक्षण आणि विवाहाच्या खर्चाची जबाबदारी सामूहिक पातळीवर सांभाळली जाते.

हिवरे बाजार गावाने केलेली प्रगती आश्चर्यकारक

या उपक्रमामुळे हिवरे बाजार गावाने आर्थिक आणि सामाजिक पातळीवर केलेली प्रगती आश्चर्यकारक आहे. सन १९९० मध्ये गावात १८२ पैकी १६८ कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली होती. सध्याच्या स्थितीत केवळ २ ते ३ कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. गावाचा आर्थिक स्तर पहाता आधी गावकऱ्यांना रोजगारासाठी शहरात स्थलांतर करावे लागायचे. आता गावात ५० पेक्षा जास्त कुटुंबे करोडपती आहेत. पूर्वी दररोज साधारण १५० लीटर दूध उत्पादन व्हायचे. आता रोज सुमारे ४,००० लीटर दुधाचे उत्पादन होते. रोजगाराअभावी गावातील लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर करत होते.  या उपक्रमामुळे शहरांकडे स्थलांतर झलेले लोक पुन्हा गावात परतले आहे.

हिवरे बाजारचा ‘आनंदी कुटुंब समृद्ध ग्राम’ या उपक्रमामुळे हे सिद्ध झाले की, जर गावाने एकत्र येऊन, शिस्त पाळून आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केला, तर सरकारी मदतीवर अवलंबून न राहता कोणतेही गाव स्वावलंबी आणि समृद्ध बनू शकते.