NEET Exam : नगर : नीट परीक्षाबद्दल (NEET Exam) जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याबद्दल मी स्वतः केंद्र शासनाकडे वेगळा प्रस्ताव देणार आहे. अशा परीक्षा या राज्य सरकारनेच घ्याव्यात, अशी मागणी मी करणार आहे. जर या परीक्षा राज्य सरकारने घेतला तर शासकीय महाविद्यालय, अनुदानित विद्यालय त्यांच्यावरही जबादारी वाढेल. कोचिंग क्लासेसच्या नावाखाली जी लूट सुरु आहे ती थांबेल असे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटले आहे. अहिल्यानगर येथील पत्रकार सुशील थोरात (Sushil Thorat) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची भेट घेतली. नंतर त्यांनी माध्यमंशी संवाद साधला.
नक्की वाचा : जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देणार : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम
राहुल गांधी यांच्या “छात्रो की गुंज” या कार्यक्रमावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे, राहुल गांधी यांनी सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असे उपक्रम हाती घेऊन स्वतःचराजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सुरू केलं आहे. लोकसभेत सलग तीन वेळा पराभव झाल्याने आणि जनतेतील त्यांची झालेली प्रतिमा खराब झाली असल्यानेच राहुल गांधींनी या आंदोलनाचा उपयोग करून घेत आहेत असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. मागे जेंव्हा सरकार आलं होतं, त्यावेळेला हे लोक झोपले होते का? आत्ताच यांना अशा गोष्टी का सुचतात असा टोला त्यांनी लगावला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पैसे देऊन लोक आणले जात असल्याचा आरोप (NEET Exam)
तसेच राहुल गांधी छात्रो की गुंज कार्यक्रमात पैसे देऊन लोक आणले जात असल्याचा आरोप होतोय. यावर राधाकृष्ण विखे म्हणले, राहुल गांधी विद्यार्थी आंदोलनाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याची जी चर्चा सुरू आहे ही फार गंभीर आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या अशा आंदोलनात कितीही सहभागी झाले तरी विद्यार्थ्यांना देखील राहुल गांधी काय आहेत हे माहित आहे. त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही, हे वास्तव असल्याचे विखे यांनी म्हटल आहे.
विखे पाटलांनी केला हल्ल्याचा निषेध
अहिल्यानगर येथील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने थोरात यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या थोरात यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, पालकमंत्री विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी गुंडांचे धाडस एवढे वाढणे हे आश्चर्यकारक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. तर सुदैवाने थोरात यांना फार मोठी दुखापत झाली नसली, तरी हा प्राणघातक हल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोपी सर्वांना माहिती असताना त्यांना तातडीने अटक होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांकडून काही मदत झाली का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसेच या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा विखेने दिला आहे.



