
Dr. Radhakrishna Vikhe Patil : नगर : जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी (Industrial Investments) पुढाकार घेत असून या उद्योगास सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात (Pandit Jawaharlal Nehru Hall) आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : धीरज परदेशीची हत्या का आणि कशी झाली? पोलिसांच्या रिमांडमधून घटनाक्रम उघड

नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न
यावेळी आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक दीपक शिवदास अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे ,निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके यांच्यासह उद्योजक अरविंद पाडगावकर, प्रकाश भामरे, बाबासाहेब काळे, गिरधर आसणे व अन्य उद्योजक या गुंतवणूक परिषदेत उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूक वाढवून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी उद्योजकांना जमीन आणि औद्योगिक सुविधासाठी रस्ते, पाणी, वीज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उद्योगासाठी अहिल्यानगर जिल्हा नवा पर्याय उपलब्ध (Dr. Radhakrishna Vikhe Patil)
जिल्ह्यात शिर्डी, सुपा, घोडेगाव, अहिल्यानगर व श्रीरामपूर या औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकी मुळे उद्योगासाठी अहिल्यानगर जिल्हा नवा पर्याय उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी एमआयडीसीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून, रोजगार उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच उद्योगास पोषक असलेले सुरक्षा आणि सुविधापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यामध्ये सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शिर्डी विमानतळ विस्तार, छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीन फिल्ड कॉरिडोर व संरक्षण क्षेत्रात होणारी गुंतवणूक तसेच कृषी आधारित उत्पादनात, लघुउद्योग आणि सूक्ष्म लघु उद्योगाच्या बाबतीत उद्योजकांना गुंतवणुकीच्या करारामध्ये तरुण उद्योजक आणि महिला उद्योजक पुढे येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना गुंतवणुकीमध्ये प्राधान्य
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहआयुक्त वृषाली सोने यांनी जिल्ह्यात १३, हजार १७३ कोटी रुपयांची गुंतवणूक करार झाले असून यामध्ये ११हजार९४८ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ८३ कंपन्याने गुंतवणूक करार केल्याबाबतची माहिती दिली. यामध्ये दहा हजार कोटी ही संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक असल्याचेही त्यांनी नमूद केले. एक जिल्हा एक उत्पादन मध्ये साखर आणि दूध उत्पादनातही तरुण उद्योजकाने गुंतवणूक केली असून मैत्रीच्या २.० या पोर्टल अंतर्गत सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना गुंतवणुकीमध्ये प्राधान्य दिले असून यामध्ये सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली १७६ सेवा उपलब्ध आहेत. याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमात केले. उद्योजक अरविंद पाडगावकर, अद्विक ग्रुपचे मायकल यांनी मनोगत व्यक्त केले.


