Kirankumar Kabadi : किरणकुमार कबाडी यांची याचिका मॅटने फेटाळली; शिर्डीला झालेली बदली कायम

कबाडी यांच्याविरोधात औपचारिक विभागीय चौकशी सुरू

0
Kirankumar Kabadi : किरणकुमार कबाडी यांची याचिका मॅटने फेटाळली; शिर्डीला झालेली बदली कायम
Kirankumar Kabadi : किरणकुमार कबाडी यांची याचिका मॅटने फेटाळली; शिर्डीला झालेली बदली कायम

Kirankumar Kabadi : नगर : तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (Kirankumar Kabadi) यांनी आपल्या बदलीला आव्हान देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (MAT) मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेली याचिका न्यायाधिकरणाने फेटाळून लावली. त्यामुळे साई मंदिर सुरक्षा, शिर्डी येथे त्यांची करण्यात आलेली बदली कायम राहिली आहे.कबाडी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी संतोष रामचंद्र मुटकुळे (Santosh Ramchandra Mutkule) यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी (ता.२७) सुनावणी झाली.

नक्की वाचा : राहात्यात भरदिवसा दुकानदार महिलेची फसवणूक; साधूच्या रुपात आलेल्या दोघांनी घातला गंडा

कबाडी यांचे न्यायाधिकरणात आव्हान

कबाडी यांच्या बदलीचा आदेश ११ जून २०२६ रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या जागी प्रतिवादी संतोष मुटकुळे यांची नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही आदेशांना कबाडी यांनी न्यायाधिकरणात आव्हान दिले होते.कबाडी यांच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे शाखेशी संबंधित अमली पदार्थांच्या साठ्यातून सुमारे तीन कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. न्यायाधिकरणासमोर प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आलेल्या भूमिकेनुसार, अर्जदाराच्या थेट पर्यवेक्षणाखाली अमली पदार्थांची मोठी चोरी झाल्याने विभागाची विश्वासार्हता आणि सचोटी अबाधित ठेवण्यासाठी त्यांची बदली करणे आवश्यक होते. तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या मागण्या आणि विधानसभेत सरकारने दिलेल्या अधिकृत आश्वासनाचाही बदलीच्या निर्णयात विचार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

न्यायाधिकरणाने मूळ अर्ज फेटाळला (Kirankumar Kabadi)

दरम्यान, १८ जून २०२६ रोजी कबाडी यांच्याविरोधात औपचारिक विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशीही मुदतपूर्व बदलीसाठी महत्त्वाचा वैधानिक आधार असल्याचे प्रशासनाने न्यायाधिकरणात स्पष्ट केले.महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२एन(२) मधील तरतुदींचे पालन करून तसेच राज्य पोलीस मुख्यालयाच्या प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांनुसारच ११ जूनचा बदली आदेश काढण्यात आल्याचे न्यायाधिकरणाच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
कबाडी यांना बदलीच्या आदेशात कोणतीही कायदेशीर त्रुटी, प्रक्रियात्मक बेकायदेशीरता किंवा दुर्भावना असल्याचे ठोसपणे सिद्ध करता आले नसल्याचे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. न्यायाधिकरणाने मूळ अर्ज फेटाळून लावत कबाडी यांची साई मंदिर सुरक्षा, शिर्डी येथे बदली करणारा ११ जून २०२६चा आदेश आणि त्यांच्या जागी संतोष मुटकुळे यांची नियुक्ती करणारा १५ जून २०२६चा आदेश कायदेशीर, वैध आणि योग्य असल्याचे ठरविले.