Sunetra Pawar : बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपासून; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी

0
Sunetra Pawar : बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपासून; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती
Sunetra Pawar : बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपासून; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

Sunetra Pawar : नगर : ‘बीड–अहिल्यानगर-पुणे’ रेल्वे (‘Beed–Ahilyanagar-Pune’ Railway) येत्या १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (Marathwada Liberation Day) मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबर अखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचनााही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी दिली.

नक्की वाचा : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात ४१ हजार २९३ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली

सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात आयोजित बैठक आज पार पडली. पवार यांनी बोलाविल्या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबर अखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू (Sunetra Pawar)

बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली असल्याचं स्पष्ट केलं. गतवर्षी बीडकरांची ४० वर्षांची प्रतीक्षा संपवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (१७ सप्टेंबर २०२५ रोजी) ‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली आणि आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू होत आहे. ‘बीड–पुणे’ रेल्वे सुरू झाल्यानंतर जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट व अधिक सक्षम रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे. बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी

१७ सप्टेंबर रोजी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय व सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करून सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवेच्या ऐतिहासिक शुभारंभ कार्यक्रमाची सर्व तयारी अत्यंत नियोजनबद्ध, प्रभावी आणि समन्वयाने करण्याच्या सूचनाही दिल्या. ‘बीड–पुणे’ आणि पुढे ‘बीड–मुंबई’ ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.