Rescue of cattle confined for slaughter : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ गोवंशीय जनावरांची सुटका; संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Rescue of cattle confined for slaughter

0
Rescue of cattle confined for slaughter
Rescue of cattle confined for slaughter

Rescue of cattle confined for slaughter : नगर : कत्तलीच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये आणि मोकळ्या जागेत डांबून ठेवलेल्या १४ गोवंशीय जनावरांची (Rescue of cattle confined for slaughter) स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी (ता.११) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या (Sangamner City Police Station) हद्दीतील कुरण गावच्या शिवारात करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेतील सर्व संशयित आरोपी पसार झाले आहेत.

अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संगमनेर परिसरात माहिती संकलन सुरू केले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांकडून संशयितांचा शोध (Rescue of cattle confined for slaughter)

यावेळी कुरण येथील जमील शेख याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथे १४ लहान-मोठी गोवंशीय जनावरे आढळून आली. घटनास्थळावरील नागरिकांकडे चौकशी केली असता ही जनावरे जमील उर्फ जमालुद्दीन शेख, अशपाक राजू शेख, तनवीर मुन्ना पठाण, आदिल शेख (पूर्ण नाव माहीत नाही) आणि सलमान शेख (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला; मात्र ते घटनास्थळी मिळून आले नाहीत.

पोलिसांनी १४ गोवंशीय जनावरांची, अंदाजे १ लाख रुपये किमतीची, सुटका करून त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.