MPSC : एमपीएससीच्या (MPSC) ‘एफडीए’ पेपरफुटी आणि परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राज्यात संतापाचे वातावरण असताना एक मोठी घटना घडली आहे. नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एकच गोंधळ उडाला आहे.

ही भ्रष्ट आणि नालायक व्यवस्थेला थप्पड!
या धाडसी कारवाईनंतर संभाजी ब्रिगेडने आपली अधिकृत आणि आक्रमक प्रतिक्रिया जाहीर केली आहे. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “MPSC चा अभ्यास करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि नालायक सरकारच्या तोंडाला काळं फासलं आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या जी थोबाडीत मारली आहे, ती या सरकारला जनतेच्या वतीने मारलेली सणसणीत थप्पड आहे.”
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाला वाट (MPSC)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) आणि इतर विविध परीक्षांमधील कथित पेपरफुटी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाला वाट करून देत आज संभाजी ब्रिगेडने थेट ऍक्शन मोडमध्ये येत MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासले आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात प्रवेश करून ही आक्रमक कारवाई केली.
Table of Contents



