नगर : जेसीबीने वावरातल्या बाभळी काढल्या म्हणून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात(Crime News) आल्याची घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील काष्टीत घडली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted murder) केल्याप्रकरणी चौघांना सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा (Punishment for Forced Labor) श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. साळुंखे यांनी ठोठावली, अशोक गोविंद पाचपुते, नानासाहेब राजाराम पाचपुते, दीपक अशोक पाचपुते आणि दत्ता गोविंद पाचपुते (सर्व रा. काष्टी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : भीमाशंकर अभयारण्यातील ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड; कारण काय?
प्रकरण नेमकं काय? (Crime News)
अंकुश बापूराव खोरे हे १५ मे २०१७ रोजी शेतात बाभळीची झाडे काढत होते. याचाच राग मनात धरून आरोपींनी ‘तू जेसीबीने बाभळी का काढतोस? यामुळे आमच्या पाइपचे नुकसान होईल,’ असे म्हणत फिर्यादी आणि साक्षीदारांशी वाद घातला. यादरम्यान अशोक पाचपुते याने साक्षीदार पांडुरंग अंकुश खोरे यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा वार अडविताना खोरे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाले. या घटनेनंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली तलवार लपवून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने आणि पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल आहे. या प्रकरणी सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी यात महत्त्वाच्या ठरल्या.
अवश्य वाचा : अहिल्यानगरचे वादळी व्यक्तीमत्व हरपले; ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन
चारही आरोपींना सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा (Crime News)
सरकारी वकील केदार केसकर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायनिवाड्यांच्या आधारे केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयाने या चारही आरोपींना सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच धमकी दिल्याप्रकरणी प्रत्येकी दोन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अशोक पाचपुते याला स्वतंत्रपणे दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहिले, पोलिस हवालदार एन. आय, नरुटे यांनी यामध्ये पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.



