
Roadblock Operation : नगर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे (Dr. Dilip Tiparse) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे. यामध्ये 23 ते 26 ऑक्टोबर या काळात ही विशेष नाकाबंदी मोहीम (Roadblock Operation) राबवण्यात आली. यामध्ये 1 हजार 147 वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करून 10 लाख, 53 हजार 500 रुपयांचा दंड (Penalty) आकारण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थारोत व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
नक्की वाचा : दहा वर्षांचे प्रेमसंबंध; दुसऱ्या प्रियकराचा संशय अन् महिला कर्मचाऱ्याची हत्या
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
या काळात रात्री 10 ते पहाटे या वेळेत अहिल्यानगर शहर हद्दीत अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान ट्रिपल सीट वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट असणे किंवा नंबर प्लेट नसणे, लायसन्स सोबत न बाळगणे, वाहनांना काळी काच लावणे, मॉडिफाय सायलेन्सर वापरणे, ड्रंक अँड ड्राईव्ह अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, HSRP नंबर प्लेट नसणे, मोबाईलवर बोलणे आणि सीट बेल्ट न लावणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भविष्यात अधिक कठोर कारवाईचा इशारा (Roadblock Operation)
अहिल्यानगर शहरामध्ये यापुढेही टवाळखोर तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणे, बुलेट फटाका सायलेन्सर वापरणे, लायसन्स न बाळगणे आणि मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.


