Murder : दहा वर्षांचे प्रेमसंबंध; दुसऱ्या प्रियकराचा संशय अन् महिला कर्मचाऱ्याची हत्या

सफाई कर्मचारी आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला

0
Murder : दहा वर्षांचे प्रेमसंबंध; दुसऱ्या प्रियकराचा संशय अन् महिला कर्मचाऱ्याची हत्या
Murder : दहा वर्षांचे प्रेमसंबंध; दुसऱ्या प्रियकराचा संशय अन् महिला कर्मचाऱ्याची हत्या

Murder : नगर : भिंगारजवळच्या वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातच (Gram Panchayat office) सफाई कामगार महिलेचा चाकू व लोखंडी रॉडने खून (Murder) करण्यात आला. मंगळवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली. अनिता देविदास आळकुटे (वय ४०, रा. वडारवाडी, ता. अहिल्यानगर) असे मृत (Dead) महिलेचे नाव आहे.

नक्की वाचा : भीमाशंकर येथील वृक्षतोडीचा निषेध; पर्यावरण श्रमप्रेमींचे कर्जत तहसीलदारांना निवेदन

दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याचा संशय

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या डोक्यात पाण्याचा व्हॉल घातल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याच्या संशयातून संतोष धोत्रे (वय ४९) याने ग्रामपंचायत कार्यालयात महिला सफाई कर्मचारी आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अनिता यांचा मृत्यू झाला. अनिता आणि संतोष यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव (Murder)

अनिता यांचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष याला आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याच संशयातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिता यांचा मुलगा योगेश आळकुटे याची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे करत आहे.

भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीतच लागोपाठ खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी धाक निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.