Ahilyanagar News : रब्बी ज्वारीसाठी मिळणार मोफत बियाणे; १० नोव्हेंबरला होणार वाटप

0
Ahilyanagar News : रब्बी ज्वारीसाठी मिळणार मोफत बियाणे; १० नोव्हेंबरला होणार वाटप

नगर : कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश (Ahilyanagar News) परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासह (Increasing the area under sorghum cultivation) शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण उप अभियानाअंतर्गत पौष्टिक तृणधान्य म्हणजेच (रब्बी ज्वारी) सन २०२६-२७ या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी २१ हजार २० बियाणे मिनीकिट्सचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.

नक्की वाचा : पत्नी, तिचा प्रियकर यांच्या त्रासामुळे पतीने संपविले जीवन; मिरजगाव येथील घटना

कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या, तसेच दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या रब्बी ज्वारी पिकाला प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित वाणांच्या बियाण्यांचा लाभ मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

मिनी किटमध्ये काय मिळणार? (Ahilyanagar News)

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका मिनीकिटमध्ये ४ किलोंच्या पॅकिंगमध्ये एक एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे वितरित करण्यात येणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले यशोमती हे वाण देण्यात येणार आहे. हा वाण कोरडवाहू किंवा अवर्षणप्रवण भागासाठी योग्य असून, कमी पाण्यावर लवकर पक्व होणारा आहे. हे वाण चारा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, टंचाई परिस्थितीमध्ये या वाणातून हेक्टरी ४० ते ५० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळू शकते. 

अवश्य वाचा : राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार?

महाडीबीटीच्या संकेत स्थळावर अर्ज करण्यास दहा दिवसांची मुदत (Ahilyanagar News)

अहिल्यानगर जिल्ह्यातील कडब्यासाठी राज्यभरातून मागणी असल्याने दुष्काळजन्य परिस्थितीत चारा पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनाचा जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण उपअभियानाअंतर्गत राबवलेल्या या योजनेसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर अर्ज करण्यासाठी दहा दिवसांची मुदत आहे. या योजनेंतर्गत महिलांना प्राधान्याने लाभ देण्यास सांगण्यात आलं आहे. महिला खातेदारांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करावेत. १० नोव्हेंबरला बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले आहे.