नगर : पत्नीचे अनैतिक संबंध,(Wife’s extramarital affair) तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने राहत्या घरी गळफास (Karjat Sucide News) घेऊन जीवन संपवले आहे. धम्मसागर तुकाराम घोडके (वय ३६, रा. शाहूनगर, मिरजगाव) असे मयताचे नाव आहे. रविवारी (ता.२५) ऑक्टोबरला रात्री साडेअकरा वाजता मिरजगाव (Mirajgaon) येथे ही घटना घडली. याप्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी पूजा धम्मसागर घोडके व तिचा प्रियकर शांताराम ऊर्फ संग्राम बापू घोडके यांच्याविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नक्की वाचा : भीमाशंकर अभयारण्यातील ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड; कारण काय?
नेमकं काय घडलं? (Karjat Sucide News)

मृत धम्मसागर यांची आई विजया तुकाराम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,धम्मसागरची पत्नी पूजा हिचे त्यांच्याच भावकीतील शांताराम ऊर्फ संग्राम घोडके याच्यासोबत गेल्या दीड वर्षापासून अनैतिक संबंध होते. गेल्या वर्षभरापासून शांतारामसोबत ती जामखेड येथे राहत होती. याबाबत धम्म सागर यांनी शांतारामला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र,पूजा व शांताराम हे दोघेही त्यांना वारंवार मानसिक त्रास देत होते. रविवारी रात्री घरी आल्यानंतर धम्मसागर यांना रात्री साडेअकरा वाजता त्याच्या आईने आवाज दिला, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. घरात पाहणी केली असता, छताच्या लोखंडी अँगलला त्याने गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अवश्य वाचा : अहिल्यानगरचे वादळी व्यक्तीमत्व हरपले; ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन
धम्मसागरला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. आता या घटनेचा सखोल तपास मिरजगाव पोलिस करीत आहेत. पोलिसांच्या तपासात आता नेमकं काय समोर येणार हे पाहावे लागणार आहे.



