Fire At The Dumping Yard : कल्याण रोडवरील महापालिकेच्या ग्रीन वेस्टच्या डम्पिंग यार्डला आग

सुमारे १२ ते १३ गाड्यांनी पाण्याचा मारा

0
Fire At The Dumping Yard : कल्याण रोडवरील महापालिकेच्या ग्रीन वेस्टच्या डम्पिंग यार्डला आग
Fire At The Dumping Yard : कल्याण रोडवरील महापालिकेच्या ग्रीन वेस्टच्या डम्पिंग यार्डला आग

Fire At The Dumping Yard : नगर : वारूळाचा मारती परिसरात कल्याण रोडकडे (Kalyan Road) जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या महापालिकेच्या ग्रीन वेस्टच्या डम्पिंग यार्डला २८ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठी आग (Fire) लागली. झाडांच्या फांद्या. वाळलेला पालापाचोळा यामुळे काही मिनिटातच आग सर्वत्र पसरली. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) पथकाने माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली.

नक्की वाचा : अकोले तालुक्यातील शेंडी येथे गुप्तधनाच्या आशेने अघोरी कृत्ये; गुन्हा दाखल

नागरी वस्तीमध्ये आगीचा धूर

दुपारी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुमारे १२ ते १३ गाड्यांनी पाण्याचा मारा केला. आग विझवण्यात पथकाला यश आले असले तरी घग कायम असल्याने रात्री उशिरापर्यंत आणि पुन्हा २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पाण्याचा मारा सुरूच होता. या आगीमुळे दुपारपासून सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. लगतच्या घरांमध्येही धुराचे लोट पसरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. डम्पिंग यार्डपासून सुमारे दोनशे मीटरच्या परिसरात नागरी वस्तीमध्ये आगीचा धूर पसरल्याने नागरिकही हवालदिल झाले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आग विझवण्याचा प्रयत्न (Fire At The Dumping Yard)

रात्री उशिरापर्यंत आणि २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा महापालिकेच्या अग्निशामक दलाने या ठिकाणी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अग्निशामक विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माळीवाडा येथील पथकाचे वाहन चालक शुभम गावडे, फायरमन कृष्णा सांगळे, अविनाश साठे, दीपक गर्जे, विठ्ठल चितळकर तर सावेडी येथील पथकाचे वाहन चालक वैभव पिसे, फायरमन अनिकेत शेलार, भूषण घाटविसावे, कृष्णा जावळे, अक्षय पालवे आदींचा समावेश होता.

वारुळाचा मारुती परिसरातून डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कचरा, पालापाचोळा पेटलेला दिसून आला. डम्पिंग यार्डजवळ जाणीवपूर्वक कचरा पेटवल्याचा संशय व्यक्त होत आहे. मागील महिन्यातही याच परिसरात भंगार  साहित्य पेटले होते.