नगर : सांस्कृतिक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या (Ahilyanagar DJ Noise) वापरावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजे असावा कि नकॊ, हा चर्चेचा विषय सुरु असतानाच या विषयावर महापालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची समन्वय बैठक (Public Ganesh Mandal meeting) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्ही प्लाझ्मा, लेझर लावणार नाही, आवाजाची मर्यादाही पाळू, पण आम्हाला डीजे वाजवू द्या, असा एकमुखी सूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या समन्वय बैठकीत लावला. यावेळी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास आम्ही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करणारच,असा इशारा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) यांनी मंडळांना दिला आहे.
नक्की वाचा : डिंभे–माणिकडोह बोगद्याला मंजुरी; अहिल्यानगरसह ३ जिल्ह्यांतील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार
महापालिकेच्या या बैठकीला महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त यशवंत डांगे, यांसह अनेकजण उपस्थित होते.
या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी विसर्जन मिरवणुकीत इच्छुक मंडळांना सहभागी होण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे, तसेच शेवटचा गणपती दिल्लीगेटच्या बाहेर पडेपर्यंत मिरवणूक सुरू राहील, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, पोलिसांनी कारवाई करताना डीजेचे सर्व साहित्य जप्त करू नये, यासारख्या मागण्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लावून धरल्या.
तर आम्ही सर्व सहकार्य करू, परंतु तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, प्रत्येक मंडळाने आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास आम्हाला न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करावी लागेल, असा इशारा पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी दिला. त्याचबरोबर, डीजे बाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या स्तरावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, या बैठकीत मंडळांना सर्व नियम समजावून सांगितले जातील. आवाजाच्या मयदिबाबत डेमो देखील देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी स्पष्ट केलय.
अवश्य वाचा : रक्ताचे नाते बनले वैरी! चुलत भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
या बैठकीत गणेश मंडळांनी आणखी ही काही महत्वाच्या मागण्या केल्यात.
गणेश मंडळांनी केलेल्या महत्वाच्या मागण्या (Ahilyanagar DJ Noise)
१. माळीवाडा परिसरातील अतिक्रमणे काढावीत
२. महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी
३. अखेरचा गणपती बाहेर पडेपर्यंत मिरवणूक सुरू ठेवा
४. इच्छुक सर्व मंडळांना मिरवणुकीत सहभागी करा
५. वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त करावेत
६. मिरवणूक अडवून ठेवणाऱ्या मंडळांची दक्षता घ्यावी
७. सावेडी उपनगरात मंडळांना शिस्त लावावी
अशा महत्वाच्या मागण्या करण्यात आल्यात. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे, मंडळांना सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने घेता येतील, गेल्यावर्षी २७२ मंडळांना परवानगी देण्यात आली होती. या मंडळांना नव्याने परवानगी घेण्याची गरज नाही, पुढील पाच वर्षापर्यंत या परवानग्या ग्राह्य धरण्यात येतील. परंतु इतर आवश्यक परवानग्या त्यांना घ्याव्या लागणार आहेत. उत्सव काळात भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी शहरातील रस्त्यांचे पंचिंग करण्यात येणार आहे, तसेच कापडबाजारातील रस्त्याचे सुरू असलेले काम पुढील आढवड्यात पूर्ण होणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी या बैठकीत सांगितलय. यामध्ये पोलिसांची भूमिका काय असेल तर त्यांनी थेटच सांगितले आहे की,
पोलिसांची भूमिका काय? (Ahilyanagar DJ Noise)
गणेशोत्सव काळात आक्षेपार्ह कृती, जुगार, मद्य सेवन करू नये,
पोलिसांची भूमिका झीरो टोलरन्स असेल,
ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई होणारच
एक मंडळ एक पोलिस हा उपक्रम राबवणार
गणेशोत्सव काळात मंडळांनी समन्वयासाठी स्वयंसेवक नियुक्त करावेत, असं पोलीस प्रसाशनाने सुद्धा स्पष्ट केलं आहे.



