AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या फ्लेक्समुक्त अहिल्यानगर मोहिमेअंतर्गत प्रभाग समिती क्रमांक १ अंतर्गत श्रीराम चौक रोड (एसबीआय एटीएम समोर), श्रीराम चौक पाईपलाईन रोड, पार्वती कॉर्नर हॉटेल परिसर, भिस्तबाग चौक येथील स्ट्रीट लाईट पोलवरील बोर्ड, सोनानगर चौक येथील कॅमेरावर आडवा लावलेला बोर्ड, समर्थ शाळा उपनगर कुष्ठधाम रोड, प्रोफेसर कॉलनी चौक तसेच नोबल हॉस्पिटल रोडवरील दत्त मंदिर समोरील प्रेमदान हडको कॉर्नर येथे अनधिकृत फलक व बोर्ड हटविण्याची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : पुणे – शिर्डी रेल्वे आजपासून धावणार; जाणून घ्या वेळापत्रक आणि महत्वाचे थांबे
शहराचे सौंदर्य अबाधित राखणार
तसेच प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत लाल टाकी रोड व पोलीस मुख्यालयाजवळील परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही बोर्ड स्ट्रीट लाईट पोलवर लावलेले आढळून आले, तर काही फलक रस्त्याच्या मध्यभागी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी संबंधित फलक तात्काळ हटविण्यात आले.
नक्की पहा : वीरगावच्या शेतकऱ्याची दीड एकरातील जांभूळ बागेतून लाखोंची कमाई
मोहिमेत सातत्य ठेवणार (AMC)
प्रभाग समिती क्रमांक १ व ३ मिळून एकूण १६ अनधिकृत बोर्डांवर कारवाई करण्यात आली असून फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.



