Amol Khatal : संगमनेर : लोकशाहीमध्ये (Democracy) पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो आणि त्याचे आत्मचिंतन करायचे असते. जनता हीच खरी न्यायाधीश (Judge) आहे. त्यांनी दिलेल्या निकालानंतरही तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असा विश्वास आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केला. तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामस्थ व धर्मनाद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर आणि धांदरफळ गटातील ३६ गावांतील भजनी मंडळांना आमदार अमोल खताळ पाटील आणि शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांच्या हस्ते भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नक्की वाचा : सांगवीतील घरफोडी उघड; सराईत चोरट्यासह १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आमदार खताळ म्हणाले की
आमदार खताळ म्हणाले की, धर्मनाद प्रतिष्ठानने धार्मिक कार्यक्रम आणि गावातील भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करणे ही अत्यंत चांगली बाब आहे. तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेने देव, देश आणि धर्म टिकविण्याची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकली आहे. ती जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. धांदरफळ खुर्द गावचे सुपुत्र स्वर्गीय बी. जे. खताळ पाटील यांनी गावाचे नाव राज्यासह देशभर पोहोचविले. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊनच आपण राजकारणात कार्यरत आहोत.“हर हर महादेव” ही घोषणा घेऊन राजकारणात पुढे चालत राहिलो आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जनता मला साथ देईल (Amol Khatal)
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मूलमंत्र घेऊन काम करत आहे. माझ्या डोक्यात कधीही आमदारकीची हवा गेलेली नाही आणि जाणारही नाही. ज्या दिवशी मला काम करणे शक्य होणार नाही, त्या दिवशी मी स्वतः थांबेन. मात्र, संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न माझ्या हातून सुटत असल्याने जनता मला साथ देईल, असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष कानवडे, भागवत कानवडे, सतीश गोपाळे, कोंडाजी कडनर, सागर खताळ, सतीश कोकणे, मिलिंद खताळ, उमेश कोकणे, मिनानाथ खताळ, दत्ता शेटे, पंकज जोंधळे, संकेत खुळे, महेश सातपुते तसेच धांदरफळ तरुण मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी यादव महाराज देवगिरे, अर्जुन महाराज खताळ बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खताळ त्रिंबक खताळ धोंडीबा खताळ, मंगल खताळ, निलम खाताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



