West Bengal: नगर: पश्चिम बंगलाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब (Sealed) करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 मे रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. सुवेंदू यांनी भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यांनी नंदीग्राममधूनही सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला, जिथे त्यांनी 2021 मध्ये ममता यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागा जिंकल्या. आज सकाळी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी शाह कोलकात्यात दाखल झाले तेव्हा सुवेंदू यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने शाह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
अवश्य वाचा- – वीरगावच्या युवा शेतकऱ्याचे काकडी उत्पादनात दमदार यश
पश्चिम बंगालमध्ये उपमुख्यमंत्रीपद गेल्या 26 वर्षांपासून रिक्त (West Bengal)
पश्चिम बंगालमध्ये उपमुख्यमंत्रीपद गेल्या 26 वर्षांपासून रिक्त आहे. 5 नोव्हेंबर 2000 पर्यंत, दिवंगत सीपीएम नेते बुद्धदेव भट्टाचार्य हे ज्योती बसू यांच्या सरकारमध्ये हे पद भूषवणारे शेवटचे नेते होते. राज्यात आतापर्यंत केवळ तीन उपमुख्यमंत्री झाले आहेत. यामध्ये ज्योती बसू, बिजय सिंग नाहर आणि बुद्धदेव भट्टाचार्य यांचा समावेश आहे. सीपीआय(एम) नेते ज्योती बसू यांनी दोनदा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी प्रथम 1 मार्च 19967 ते 21 नोव्हेंबर 1967 पर्यंत आणि दुसऱ्यांदा 25 फेब्रुवारी 1969 ते18ॉ मार्च १९७० पर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. काँग्रेस नेते बिजय सिंग नाहर यांनी 2 एप्रिल 1971 ते 258 जून 1971 पर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ज्योती बसू मुख्यमंत्री असताना, सीपीआय(एम) नेते बुद्धदेव भट्टाचार्य 12 जानेवारी 1999 ते 2५ नोव्हेंबर 2000 पर्यंत उपमुख्यमंत्री होते.
नक्की वाचा- तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, जाहिरात कधी निघणार?
कोण आहेत सुवेंदू अधिकारी? (West Bengal)
सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे झाला. राजकीय वातावरणात वाढ झाल्यामुळे त्यांनी लहान वयातच राजकारणात रस दाखवला. त्यांनी विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार बनले. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि 2016 मध्ये नंदीग्राम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
ममता बॅनर्जी यांना दोनदा हरवलं (West Bengal)
डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी TMC सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ममता बॅनर्जी यांना कडवी टक्कर देत पराभूत केले, ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. आताही त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.



