Application : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
Application : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
Application : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Application : नगर : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश अभ्यासक्रमांसाठी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २८ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ

येथे करा अर्ज

मांग, मातंग, मिनी मादीग, मादीग, दानखनी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या १२ पोटजातींतील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर-मनमाड मार्ग, सावेडी, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष किंवा [email protected] या ई-मेलद्वारे सादर करावेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जाणून घ्या कागदपत्रे (Application)

अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा, प्रवेश नोंदणी पावती अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र अथवा रेशनकार्ड तसेच अलीकडील पासपोर्ट आकाराचे एक छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.