Training : नगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात ‘अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम’ प्रशिक्षणास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच टी.जे.एस.बी. बँकेचे शाखाधिकारी राहुल पटवेकर आणि जनता सहकारी बँकेचे सहाय्यक शाखाधिकारी मिलिंद भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
यांचा सहभाग
प्रशिक्षणात एकूण १५ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, शासनाच्या इतर महामंडळांचा लाभ न मिळणाऱ्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी विविध स्वयंरोजगार, उद्योजकता व आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबविते. वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संपर्क साधण्याचे आवाहन (Training)
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत अमृतची कार्यालये कार्यरत असून, अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांनी बँकिंग आणि कर्ज प्रक्रियेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. मान्यवरांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले. त्यामुळे सहभागी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या समारोपावेळी जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



