Ashadhi Vari : आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

0
Ashadhi Vari : आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Ashadhi Vari : आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Ashadhi Vari : नगर : पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या दिंड्यांतील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

हेही पहा : पहरण करुन लूटमार करणारे चार आरोपी १२ तासांत जेरंबद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आषाढी वारी २०२६ नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. दिंडी मार्गावर वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात यावेत. आवश्यकतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खोल्याही उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

नक्की वाचा :  खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिक, प्रमाणित बियाणे व मिनीकिट वितरण योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

यांची उपस्थिती (Ashadhi Vari)

वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच दिंडीदरम्यान पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्याबरोबरच मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक इंधन व्यवस्थाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.