Assault : नगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात एका कुटुंबावर हल्ला (Attack) झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळीने पती, पत्नी आणि मुलीला लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण (Assault) करत जखमी केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे संशयित जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
सविता बबन सातपुते (वय ४०, रा. सातपुते मळा, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. संतोष सातपुते, किरण लोंढे, रामदास सातपुते, काशीनाथ मोढवे, बंडू सातपुते व तुन्या (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. अर्चना हॉटेल शेजारी, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (ता.१९) रात्री आठच्या सुमारास केडगाव शिवारातील एका हॉटेल समोर घडली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून वाद (Assault)
फिर्यादी महिला आणि किरण लोंढे यांच्यात कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी वाद झाला होता. या वादाची तक्रार फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. याचाच राग धरून रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल समोर संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला गाठले. आमच्या विरोधात तक्रार का देता? असे म्हणत शिवीगाळ केली. लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. यामध्ये फिर्यादीसह पती व मुलगी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.



