Rahuri Elections : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार साहित्य

Rahuri Elections : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार साहित्य

0
Rahuri Elections : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार साहित्य
Rahuri Elections : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार साहित्य

Rahuri Elections : नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे, मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हेही वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत १०० टक्के मतदानासाठी पुढाकार घ्यावा : डॉ. पंकज आशिया

प्रशासकीय तयारी (Rahuri Elections)

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत थेट या मतदान केंद्रांवरच पोहोच केले जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत ३६ पोलीस अधिकारी, ७०८ पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

नक्की पहा : नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याने संताप; संगमनेरमध्ये काँग्रेसचा निषेध

मतदानाचे आवाहन (Rahuri Elections)

याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे. मतदारसंघातील १ लाख ७२ हजार २३१ पुरुष, तसे १ लाख ६१ हजार ३१२ स्त्री आणि ०२ इतर मतदारांनी २३ एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी उर्त्स्फूतपणे सहभागी हाेउन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.