ATM machine: राहुरीतील तीन एटीएम मशीनची माथेफिरूकडून तोडफोड

तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान

0

ATM machine: राहुरी: राहुरी शहरात नगर-मनमाड रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राहुरी शाखेच्या एटीएम सेंटरमध्ये (ATM machine) गुरुवारी (ता.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास तोडफोडीची घटना घडली. एका इसमाने अचानक एटीएममध्ये प्रवेश करून आत असलेल्या चारही मशिन्सवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणात मशिनरीचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या एटीएम सेंटरमध्ये दोन सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन) आणि दोन एटीएम मशिन्स कार्यरत आहेत. आरोपीने संतापाच्या भरात किंवा मानसिक असंतुलनामुळे मशिन्सवर दगड टाकत त्यांची तोडफोड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एटीएममध्ये व्यवहारासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान (ATM machine)

या घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ बँक अधिकारी व सुरक्षा रक्षकांना कळविले. सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत संबंधित इसमाला घटनास्थळीच पकडून ठेवले. त्यानंतर राहुरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच राहुरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक अंदाजानुसार या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एटीएम सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.