Attempted Murder : खुनाच्या प्रयत्नातील दोन संशयित आरोपी जेरबंद; पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

Attempted Murder : खुनाच्या प्रयत्नातील दोन संशयित आरोपी जेरबंद; पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

0

Attempted Murder : नगर : खुनाच्या प्रयत्नाच्या (Attempted Murder) गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पुणे (Pune) येथून अटक केली आहे. आदित्य अंकुश शिरसाठ (वय २२), मंगेश अंकुश शिरसाठ (वय २०, दोघेही रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत.

नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

“थोडे बाजूला व्हा” असे सांगितल्याचा राग

या प्रकरणाची माहिती अशी की, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी फिर्यादी यांनी संशयित आरोपी अंकुश रामा शिरसाठ यांना “थोडे बाजूला व्हा” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या साथीदारांना बोलावले. त्यानंतर मंगेश शिरसाठ, आदित्य शिरसाठ, बाळासाहेब रामा शिरसाठ, लक्ष्मण शिरसाठ आणि संदीप शिरसाठ यांनी एकत्र येत फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्र, लोखंडी गज, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीस गंभीर दुखापत करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Attempted Murder)

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्यासह फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, प्रशांत राठोड आणि चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान संशयित आरोपी पुण्यातील सिंहगड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने जाधवनगर, वडगाव (पुणे) येथे सापळा रचला. तेथे संशयितरित्या फिरताना आढळलेल्या दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.